शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारपटावर पेच-डावपेच

By admin | Updated: February 18, 2017 03:46 IST

महापालिका निवडणूक प्रचारात काही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या राजकीय उलाढाली सुरू आहेत. अपक्षांना हाताशी धरून काही राजकीय

पुणे : महापालिका निवडणूक प्रचारात काही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या राजकीय उलाढाली सुरू आहेत. अपक्षांना हाताशी धरून काही राजकीय पक्षांचे उमेदवार अशा खेळ्या करीत असून, नागरिकांमध्ये त्याची चर्चा आहे. पिछाडीवर असलेले एखादे बंडखोरांचे पॅनल अचानक जोरात प्रचार करू लागणे किंवा काही अपक्षांनी एखाद्या पक्षाच्या प्रचारसभेत आपला पाठिंबा जाहीर करणे असे प्रकार होत आहेत. राजकीय गणिते लढवून केल्या जाणाऱ्या या खेळ्यांमध्ये पैशांचीही मोठी उलाढाल असल्याचे बोलले जात आहे.शहराच्या मध्यवस्तीतील एका प्रभागामधील लढत ऐनवेळचे पक्षांतर, चिन्हांची अदलाबदल, मारामारी अशा विविध कारणांनी वादग्रस्त झाली आहे. या प्रभागात वेगवेगळ्या दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. आता त्यांनी एकत्र येत या प्रभागात पॅनल तयार केले आहे. त्यांना प्रतिस्पर्धी  राजकीय पक्षानेच फूस दिली असल्याची चर्चा आहे.  हे बंडखोर त्या त्या पक्षाची मते घेतील व त्याचा फायदा आपल्याला होईल, असा होरा लढवून ही खेळी केली असल्याचे खासगीत सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)४शहराच्या पूर्वभागातील एका पक्षाच्या प्रचारसभेत अचानक त्या प्रभागातील दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेत पक्षाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यंत्रावर नाव असले तरी आपण प्रचार करणार नाही, आपल्या समर्थकांनी संबंधित पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामागे अर्ज दाखल केला तेव्हापासूनच्या खर्चाचा हिशोब करून तो उमेदवाराकडून वसूल केला असल्याची चर्चा आहे.४काही ठिकाणी मला एक मत द्या, बाकीची मते दुसऱ्या पॅनलमधील तुमच्या आवडत्या उमेदवाराला दिली तरी चालतील, असाही प्रचार खासगीत सुरू असल्याचे दिसते आहे. एकाच पक्षातून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे दोन मित्रांनी वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी करीत प्रचाराचा असा अभिनव मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या पॅनलमधील अन्य उमेदवार मात्र त्यांच्यावर विसंबून आहेत.