राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:45 IST2019-07-09T13:39:13+5:302019-07-09T13:45:00+5:30
महिला सक्षमीकरणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकलूज : वारीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या वर्षी वारी नारीशक्ती उपक्रम राबविला . या उपक्रमाचे उदघाटन पुण्यातील शनिवारवाडा परिसरात झाल्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी सामील झाली होती. यावर्षी महिला सक्षमीकरणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत वारीमध्ये महिला जागृतीकरणासंबंधी विविध कार्यक्रमांचे राबविले जात आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांना वारीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रभरातील महिला दरवर्षी वारीमध्ये सहभागी होत असतात ज्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण जास्त असते.
वारी मार्गावरील मुक्कामी वारीतील सहभागी काही वारकरी महिलांनी . त्यांना घरगुती हिंसेविषयी कायदे आणि अशी हिंसा एखाद्या महिलेसंदर्भात घडत असेल तर तिने कुठे दाद मागावी याविषयी माहिती देण्यात आली. यासंदर्भात महिला आयोगाची मदत मिळविण्याची प्रक्रिया, आयोगाशी संपर्क साधण्याचे मार्ग सांगण्यात आले. हे कायदे बऱ्याच महिलांना ठाऊक नव्हते. त्यामुळे अर्थातच तक्रार कुठे दाखल करावी याबद्दल माहिती नसल्यामुळे महिला काही करू शकत नाहीत. यावेळी उपक्रमातील सहभागी महिला आयोगाच्या कर्मचा?्यांनी ड्युटीवर तैनात असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल्सना माहिती पुस्तिका देऊन त्यांना सुद्धा महिला सुरक्षेविषयी कायद्यांची माहिती देण्यात आली.
जेजुरी परिसरात निशंक आर्टस् अँड एज्युकेशन या संस्थेच्या शिक्षक वगार्ला महिला सुरक्षेसंबंधी कायदे, महिलांना मिळणारी आर्थिक मदत याविषयी सरकारी पातळीवर उपलब्ध योजना याविषयी माहितीचा समावेश असणारी महिला आयोगाची माहिती पुस्तिका देण्यात आली, तसेच एखाद्या प्रसंगी महिला आयोग त्यांच्या कामात कसा येऊ शकतो. महिला आयोगाची मदत कशी मिळवायची यासंबंधी माहिती देण्यात आली. महिला शिक्षिकांनी यावेळी आपल्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले
........