अंगावर थुंकल्याने तरुणावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 01:50 IST2018-11-14T01:50:04+5:302018-11-14T01:50:33+5:30

पुणे : अंगावर थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली. ...

Spit on the boy with a spoon | अंगावर थुंकल्याने तरुणावर कोयत्याने वार

अंगावर थुंकल्याने तरुणावर कोयत्याने वार

पुणे : अंगावर थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
अक्षय संजय भोसले (वय २४, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र मधुकर जाधव (वय ३४, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. १० आॅक्टोबर २०१८ रोजी सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली.

जाधव सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधनी परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी ते थुंकले. जाधव यांच्या मागे दुचाकीवरून आलेल्या भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांना आमच्या अंगावर का थुंकतो? असे विचारले. त्यावेळी भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर जाधव हे तेथून पळून गेले. भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांचा पाठलाग करून पूना हॉस्पिटलच्या पुलावर त्यांना पुन्हा अडवले. त्यावेळी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करून मोबाइल, दुचाकीची किल्ली जबरदस्तीने हिसकावून पळून गेले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली होती.
 

Web Title: Spit on the boy with a spoon