शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बकेट, पिशव्या व बाकडे खरेदीवर वर्षाला १५० कोटींपेक्षा अधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 01:53 IST

नागरिकांची या वस्तूंना खूप मागणी असल्याने नगरसेवक प्रचंड अग्रही

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगत नगरसेवकांकडून दरवर्षी शहराच्या विकासकामांचे कोट्यवधी रुपये बकेट, कापडी पिशव्या आणि बाकडे खरेदीवर खर्च केले जात आहे. एका नगरसेवकाकडून सरासरी दरवर्षी दहा लाख रुपये या वस्तू खरेदीवर खर्च केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे दरवर्षी एकूण अंदाजपत्रकातील तब्बल १५० कोटींपेक्षा अधिक निधी या वस्तू खरेदीवर खर्च केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मतदारसंघात घरोघरी पोहोचण्यासाठी नगरसेवकांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी बकेट व कापडी पिशव्या आणि बाकडे खरेदीवर खर्च केला जातो. एक नगरसेवक दरवर्षी सुमारे १० लाखांपेक्षा अधिक निधी या वस्तू खरेदीवर खर्च करतात. शहरामध्ये सध्या ४ नगरसेवकांचा एक प्रभाग झाला असून, प्रभागातील सर्व नगरसेवकांनी पिशव्या खरेदी केल्यावर एकाच घरामध्ये चार-चार पिशव्या सध्या जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली. ही खरेदी दरवर्षी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जाते. त्यानंतर या वस्तू क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून वाटप केल्या जातात. परंतु टेंडर झाल्यानंतर तर किती वस्तूंचे प्रत्यक्ष वाटप केले.वस्तू खरेदीवरील बंधने कागदावर४गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये नगरसेवकांकडून नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय लागावी म्हणून प्रत्येक कुटुंबाला दोन-दोन बकेट पुरविण्यात येत आहे. तसचे शहरातील प्लॅस्टिक कमी करण्यासाठी कोट्यवधींच्या कापडी पिशव्या खरेदी करून नागरिकांना वाटप करण्यात येतात. तसेच सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी बाकडे बसविण्यात येतात. परंतु वस्तू खरेदीची प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडून वेळोवेळी यावर बंधने घालण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तू खरेदीवर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकजुटीमुळे वस्तू खरेदीवरील बंधने केवळ कागदावर राहिली आहेत.मर्यादा घालण्याचा विचारमहापालिकेतच प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या सत्ताधारी भाजपकडून किमान आपल्या नगरसेवकांना बकेट, पिशव्या आणि बाकडे खरेदीवर मर्यादा घालण्याचा विचार सुरु आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली असून, येणाºया अर्थसंकल्पात किमान भारतीय जनता पक्ष आपल्या नगरसेवकांना या वस्तू खरेदीवर काही बंधने घालण्याचा विचार करत आहे.- मुक्ता टिळक, महापौर

टॅग्स :PuneपुणेBudgetअर्थसंकल्प