भरधाव वाहनाची स्कुटीला धडक, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 21:17 IST2025-04-26T21:15:35+5:302025-04-26T21:17:02+5:30
राजगुरुनगर: खेड कनेरसर मार्गावर मांडवळा येथे भरधाव वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मूत्यू झाला. ...

भरधाव वाहनाची स्कुटीला धडक, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
राजगुरुनगर: खेड कनेरसर मार्गावर मांडवळा येथे भरधाव वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मूत्यू झाला. श्रेया संदिप खैरे ( रा. चव्हाणमळा पाबळरोड ,साई रेसिडेन्सी,मुळ गाव खैरेनगर पाबळ ता, शिरुर ) असे या अपघातातमृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २५ रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास श्रेया संदिप खैरे हि स्कुटी नंबर एम.एच.१४ एफ वाय ३४२२ वरती घरी येत असताना होलेवाडी मांडवळा रोडवर गावडे सी.एन.जी पंपासमोर खेड बाजूकडून टोयटा कंपनीची ग्लेझा कार नं.एम.एच.४३ सीएम ५०८१ या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात श्रेया खैरे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक पंपासमोर टोयोटा वाहन लावून फरार झाला. याबाबत मुलीचे आजोबा काळूराम सिताराम खैरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत श्रेयाचे वडील संदिप खैरे हे भारतीय सैन्य दलात जम्मु काश्मीर येथे नोकरीस असून श्रेया बी.बी.ए.इंदिरा कॉलेज वाकड. प्रथम वर्षाला व्यावसायिक शिक्षण घेत होती के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची स्कॉलर विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये तिला ९६ टक्के मार्क मिळाले होते.अत्यंत हुशार गुणी मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.