शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वायुवेग पथकांकडून वाहनचालकांना दणका; १४ हजारांपेक्षा जास्त बेशिस्तांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:37 IST

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली आहे.

-अंबादास गवंडीपुणे : महामार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही बेशिस्त वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवितात. अशा वाहनचालकांना आरटीओच्या वायुवेग पथकाने दणका दिला असून, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील १४ हजारांपेक्षा बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली आहे.

महामार्गावर वाहन चालविताना अपघात होऊ नये, यासाठी प्रत्येक गाडी ठरविलेल्या वेगाने आणि नियमानुसार चालविणे आवश्यक आहे. तसेच वळण मार्ग, घाट मार्गात गाडीचा वेग कमी ठेवणे गरजेचे असते. परंतु अशा ठिकाणी काही वाहनचालकांकडून ओव्हर स्पीडने (अतिवेग) गाडी चालविण्यात येते. अशा वाहनचालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येते.याशिवाय ओव्हरलोड (अवजड), लेन कटिंग, ड्रंक अँड ड्राइव्ह, मोबाइल टॉकिंग, सीटबेल्ट, फॅन्सी नंबरप्लेट, अनधिकृत पार्किंग, नो-एन्ट्री, थकीत कर, योग्यता प्रमाणपत्र नाही (फिटनेस तपासणी) यांसह विविध कारणांमुळे पुणे आरटीओकडील वायुवेग पथकाकडून (मोटार वाहन निरीक्षक) कारवाई करण्यात येते. सन २०२३ पेक्षा गेल्या यामध्ये वाढ झाली असून, वाहनचालकांनी नियम पाळून वाहन चालवावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

राज्य महामार्गावरील कारवाई - ६,४३७

राष्ट्रीय महामार्गावरील कारवाई - ७, ५९१

एकूण कारवाई - १४, ०५८

महामार्गावरील वाढते अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाते. राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी १४ हजारांपेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वेगावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे.  

-स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड