शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार

By श्रीकिशन काळे | Updated: September 23, 2024 15:22 IST

दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो, पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत चालला आहे

पुणे: राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी (दि.२३) भारतीय हवामान खात्याने केली. या परतीच्या प्रवासात मध्य भारत व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदा हवामान विभागानूसार देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सुमारे १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानूसार देशातील अनेक भागामध्ये सरासरी पावसाची नोंद झाली. दक्षिण भारतामध्ये तर प्रचंड पाऊस झाल्याने पूर स्थिती निर्माण झाली. उत्तरेकडील काही भागात सरासरी पाऊस झाला, तर ईशान्यकडील भागात कमी पावसाची नोंद झाली.

दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो. पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत आहे. मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनने माघारी गेला होता. यंदा तो २३ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला निघाला आहे.

गेल्या पाच वर्षांतील परतीचा प्रवास

९ ऑक्टोबर २०१९२८ सप्टेंबर २०२०६ ऑक्टोबर २०२१२० सप्टेंबर २०२२२५ सप्टेंबर २०२३२३ सप्टेंबर २०२४

सध्या मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. राजस्थानमधून त्याने काढता पाय घेतला. परंतु, सुरुवातीचे काही दिवस तो जागेवरच रेंगाळण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे २४ सप्टेंबरदरम्यान विदर्भात जोरदार आणि त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेचा पाऊस होईल. तसेच मुंबईसह कोकण, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ

राज्यात यलो अन‌् ऑरेंज अलर्ट !

राज्यामध्ये पुढील पाच दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस

हडपसर : ३३. ५ मिमीढमढेरे : ३१ मिमी हवेली : २५ मिमी कोरेगाव पार्क : २३.५ मिमी          दौंड : २२.५ मिमी वडगावशेरी : २२ मिमी                पाषाण : १९.१ मिमीलवळे : १८ मिमीशिवाजीनगर : १७.३ मिमीएनडीए : १० मिमी पुरंदर : ८ मिमीबारामती : ७ मिमीमगरपट्टा : ७ मिमी 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिकenvironmentपर्यावरणNatureनिसर्गmonsoonमोसमी पाऊस