शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:14 IST2023-11-22T09:14:28+5:302023-11-22T09:14:50+5:30

चार मुलं बाल न्यायमंडळासमोर हजर, तरुणाला पोलिस कोठडी...

Solving Wine Shop Robbery; Four children left, one in shackles | शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या

शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या

पुणे : शिवणे-उत्तमनगर येथील वाइन्सच्या दुकानात गावठी पिस्तूल, कोयता आणि तलवारीसह दरोडा टाकून ३ लाख ९ हजार रुपये रोख आणि तीन हजार २०० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्यांची चोरी करणाऱ्या आरोपींचा सर्व प्रताप सीसीटीव्हीची कॅमेऱ्यात चित्रित झाला अन् चोवीस तासांत पोलिसांना आरोपींचा छडा लागला. उत्तमनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली, त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

या प्रकरणात उत्तमनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून, दोन स्वतंत्र पथके तयार करून रवाना केली. उत्तमनगर पोलिस ठाणे व सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या संयुक्त तपास पथकाने मंगळवारी (दि. २१) माणिकबाग सिंहगड भागातून पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून, त्यांनी गुन्हा करताना वापरलेला गावठी कट्टा, लोखंडी हत्यार, तलावणारा, सत्तूर व चोरीस गेलेल्या ३ लाख ९० हजार रुपयांपैकी ३२ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींपैकी चार जण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना येरवड्याच्या बालन्याय मंडळ येथे हजर करण्यात आले, तर एक आरोपी तेजस राहुल पिंपळगावकर (वय १९, रा.सिंहगड रोड) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता, त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Solving Wine Shop Robbery; Four children left, one in shackles