पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा राहत्या घरात सापडला मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 15:45 IST2021-10-12T15:40:30+5:302021-10-12T15:45:42+5:30
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत गणेश तारळेकर हे कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. विवाहित असलेल्या गणेश यांना 14 वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते

पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा राहत्या घरात सापडला मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू
पुणे:कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सॉफ्टवेअर अभियंत्याचा राहत्या घरात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेश यशवंत तारळेकर (वय 47) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु पोलिसांना मात्र यामध्ये काही तरी काळेबेरे वाटते. चारी बाजूंनी या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत गणेश तारळेकर हे कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. विवाहित असलेल्या गणेश यांना 14 वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते. तीन दिवसांपूर्वी ते राहत्या घरात काही मित्रांसोबत निमित्त एकत्र बसले होते. पार्टी सुरू असताना त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे त्याच्यासोबत असलेले मित्र सांगत आहेत. हा प्रकार घडल्यानंतर मात्र त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही मित्र घटनास्थळावरून पसार झाले होते.
दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान गणेश तारळेकर यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.