शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा ताप

By admin | Updated: May 18, 2015 05:42 IST

फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे नाराज झाल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली, तर एकाने ‘सुसाइड नोट’ची पोस्ट फेसबुकवर टाकून पोलीस

पिंपरी : फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे नाराज झाल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली, तर एकाने ‘सुसाइड नोट’ची पोस्ट फेसबुकवर टाकून पोलीस यंत्रणेला कामाला लावले. हे दोन्ही प्रकार ‘सोशल मीडिया’च्या चुकीच्या वापरामुळे घडले. सोशल मीडियाचा काही जण चुकीचा वापर करतात. मात्र, यामुळे पोलिसांचा अधिकच ताप वाढत चालला आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे यापूर्वीही समाजात तणाव निर्माण झाले असून, आता तर वैयक्तिक मारहाणीच्या घटना घडू लागल्या आहेत. शहरात गेल्या दोन दिवसांत फेसबुकवर कॉमेंट केल्याने दोन मोठ्या घटना घडल्याचे समोर आले. घटना घडल्यानंतर त्यावर विचार करण्याऐवजी त्यापूर्वीच या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पूर्वी इंटरनेट चालवायचे म्हटले की, संगणकाची गरज भासायची. मात्र, सध्या मोबाईलसह व लॅपटॉपवरही इंटरनेट चालविता येते. नेटचे दरही कमी आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढला आहे. हे वापरण्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. सोशल मीडियामुळे संपर्क वाढला असला, तरी त्याचा गैरवापरही होत आहे. स्मार्ट फोनवर सोशल मीडियाचे अ‍ॅप्लिकेशन सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अनेक जण मोबाईलवरूनच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर हे अ‍ॅप्लिकेशन हाताळतात. समोरच्या व्यक्तीने एखादी कॉमेंट टाकल्यास त्यालाही तितक्याच तातडीने प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, नोंदविलेल्या प्रतिक्रियेमुळे काही पडसाद उमटतील का, याचा विचार केला जात नाही. यापूर्वीही फेसबुकवर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने समाजात तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर फेसबुकवर कॉमेंट केल्याच्या रागातून तरुणांना बेदम मारहाण करण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. हिंजवडीतील म्हाळुंगे येथील तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला. तर बुधवारी रात्री फेसबुकवर ‘सुसाईड नोट’ टाकून बेपत्ता झालेल्या चिंचवडमधील तरुणाचा शोध घेताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. (प्रतिनिधी)