शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग आताच प्रलंबित वाहतूक दंडाची वसुली का ? लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:35 IST

एकीकडे पगार कपात, कर्मचारी कपात, जेमतेम पैसे शिल्लक जवळ असणाऱ्या नागरिकांना दंड भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिकांनी उपस्थित...

ठळक मुद्देप्रलंबित दंडाची होतेय वसुली  नागरिकांना वाहतुक शिस्त लागावी यासाठी दंड वसुली करणे डोकेदुखी

पुणे : लॉकडाऊनमुळे अगोदरच वैतागले पुणेकर आता वाहतूक पोलिसांच्या दंडवसुली कारवाईने त्रागा करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे वाहतूक विभागाकडून प्रलंबित दंडाची वसुली सुरू करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वसुली करण्यास काही हरकत नव्हती. आता एवढ्या तातडीने दंड वसुलीचे कारण काय ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे पगार कपात, कर्मचारी कपात, जेमतेम पैसे शिल्लक जवळ असणाऱ्या नागरिकांना दंड भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी देखील तुरळक प्रमाणात रस्त्यावर वाहने फिरत होती. तेव्हा तर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही. शासन लॉकडाऊन उठवून काम सुरू करण्यास सांगत आहे. दुसरीकडे प्रलंबित दंडवसुलीच्या नावाने कारवाई केली जात आहे. हे दुटप्पी धोरण असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक महेश डोके याने दिली आहे. याबाबत लोकमतशी बोलताना सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले, एकीकडे तुरूंगातून जामिनावर कैदी सोडले जात आहेत. लॉकडाऊनसारखी गंभीर परिस्थिती असताना एवढ्या तातडीने दंडात्मक कारवाई का केली जात आहे ? वाहतुकीचा नियम मोडणारा तुरुंगातील गुन्हेगारापेक्षा मोठा गुन्हेगार आहे का ? असा प्रश्न पडतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता बँका बंद आहेत, पगार कपात, कर्मचारी कपात सुरू असताना नागरिकांना वाहतुक शिस्त लागावी यासाठी दंड वसुली करणे डोकेदुखी ठरत आहे. याची काही गरज नाही. सगळी परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर दंडवसुली करता येईल. आता ती थांबवणे आवश्यक आहे. 

* पोलिसांनी नेमकं काय करायचं हे सांगा. लोकांना चांगलं सांगून कळत नाही. घराबाहेर पडू नका म्हटल्यावर ते पडणार, बाहेर जाणार, पोलिसांच्या जीवाला देखील धोका आहे हे कुणी लक्षात घेणार आहे की नाही ? दंड वसुली का करतोय हे लक्षात घ्या. त्यानिमित्ताने रस्त्यावरील गर्दी कमी होईल. मोठ्या संख्येने विनाकारण नागरिक फिरत आहे. कोरोनोचा संसर्ग यामुळे वाढतो आहे. जो दंड यापूर्वी भरला नाही तो वसूल केला जात आहे. त्यात जास्त पैसे आकारले जात नाही. तसेही वेळेत दंड भरल्यास कारवाई करण्याची गरज पडत नाही. नागरिकांनी उगाच बाऊ करू नये. - पुणे पोलीस वाहतूक प्रशासन

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस