...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 09:37 PM2021-04-17T21:37:52+5:302021-04-17T21:39:12+5:30

बारामती शहरातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे.

... so now you pay attention in Baramati! MNS directly request to governor Bhagatsing koshyari | ...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

googlenewsNext

बारामती: बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने आरोग्य विषयक आणीबाणी निर्माण होवु पाहत आहे. बारामती शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची भासणारी कमतरता ,रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सुधीर पाटसकर यांनी करताना दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच बारामतीत लक्ष घालावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.


राज्यपालांना याबाबत अ‍ॅड. पाटसकर यांनी पत्र लिहित साकडे घातले आहे. या पत्रात त्यांनी स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. येथील स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली नियमबाह्य थेट रुग्णांना इंजेक्शन देत नाही.तर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जात आहेत. ते कार्यकर्ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही इंजेक्शन देत आहेत. प्रशासन एका पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे,असे वाटण्यास वाव असल्याचे पाटसकर यांनी यामध्ये नमुद केले आहे.

बारामती येथील स्थानिक प्रशासन निर्णय घेताना कधीच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही. एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकांना बोलविले जाते. अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने औषध व्यावसायिक मनमानी करत आहेत.

रेमडेसिविरच्या बाबतीत सखोल ऑडिट होण्याची गरज आहे. या वितरणाची जबाबदारी प्रशासनाची आहे,मात्र ते दबावाखाली काम करत आहेत. बारामतीचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,औषध निरीक्षक हे प्रशासकीय अधिकारी भेदभाव करत आहे.ते त्यांची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नाहीत.त्यांची चौकशी करून कारवाई व्हावी,अशी मागणी पाटसकर यांनी केली आहे.
———————————————

Web Title: ... so now you pay attention in Baramati! MNS directly request to governor Bhagatsing koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.