नायजेरियन व्यक्तीकडून काेकेनची तस्करी ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घातला छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:04 PM2019-09-23T20:04:25+5:302019-09-23T20:11:18+5:30

नायजेरियन व्यक्तीकडून दाेन लाखांचे काेकेन जप्त करण्यात आले आहे.

Smuggling of cocaine from a Nigerian person; Customs officials took a raid | नायजेरियन व्यक्तीकडून काेकेनची तस्करी ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घातला छापा

नायजेरियन व्यक्तीकडून काेकेनची तस्करी ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घातला छापा

Next

पुणे : एका नायजेयिन व्यक्तीच्या घरुन 35 ग्रॅम वजनाचे 2. 81 लाख रुपयांचे काेकेन कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. सॅमसन विन्सेंट मॅक्सवेल असे नायजेरियन व्यक्तीचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे. 

कस्टम विभागाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सॅमसन याच्या उन्ड्री येथील घरावर छापा घातला. त्याच्या घरात अधिकाऱ्यांनी काेकेन साेबतच वजनकाटा आणि त्याचा पासपाेर्ट जप्त केला. अधिकाऱ्यांनी सॅमसनकडे चाैकशी केली असता पुण्यात काेकेन विक्रीसाठी आणले असल्याचे त्याने कबूल केले. सॅमसनकडे करण्यात आलेल्या चाैकशीवरुन कस्टम अधिकारी काेकेनचा पुरवठा करणाऱ्याचा तसेच खरेदी करणाऱ्यांचा शाेध घेत आहे. 

दरम्यान पुण्याच्या कस्टम आयुक्तांनी मार्च ते जुलै दरम्यान दरम्यान 9 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची शासकीय अधिकारी आणि ड्रग्ज डिस्पाेजल कमिटीच्या उपस्थितीत कायद्याप्रमाणे विल्हेवाट लावली. या अमली पदार्थांची किंमत 1.7 काेटी इतकी हाेती.  

Web Title: Smuggling of cocaine from a Nigerian person; Customs officials took a raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.