शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:44 PM

पुढील दोन दिवस कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़.

ठळक मुद्देसध्या कोकण, सौराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सोमवारी ओडिशाच्या आणखी काही भागात, पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात तर बिहार व झारखंडच्या काही भागात झाली आहे़. अरबी समुद्रातील शाखा स्थिर आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़. पुढील चार दिवस कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़.  देवगड २७०, डहाणु, मुंबई (सांताक्रुझ) २३०, तलासरी, ठाणे २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ बेलापूर (ठाणे), वसई १७०, कल्याण, पनवेल, पेण १६०, अलिबाग, भिवंडी, माथेरान, विक्रमगड १५०, पालघर १४०, भिरा, जव्हार, उल्हासनगर १३०, अंबरनाथ, गुहागर, म्हसळा, रोहा, शहापूर, उरण ११०, मडगाव, वाडा १००, कर्जत, खेड ९०, रत्नागिरी, सुधागड, पाली ८०,  चिपळूण, कणकवली, खालापूर, मंडणगड, माणगाव ७०, मुरुड, राजापूर, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ६०, हर्णे, कुडाळ, लांजा, मोखेडा, मुरबाड, पेनॅम, पोलादपूर, फोंडा ५० मिमी पाऊस झाला़ तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात लोणावळा (कृषी), ओझरखेडा ८०, चंदगड, इगतपुरी ७०, महाबळेश्वर, पेठ ५०, गगनबावडा, पौड मुळशी, त्र्यंबकेश्वर ४० मिमी पाऊस पडला़. विदर्भात आष्टी, बुलढाणा, चिखलदरा, खामगांव, खारंघा १० मिमी पाऊस झाला़ घाटमाथ्यावरील दावडी २२०, डुंगरवाडी, शिरगाव १५०, ताम्हिणी, भिरा १३०, अम्बोणे १२०, लोणावळा (टाटा) ८०, खोपोली, कोयना (नवजा), लोणावळा (आॅफिस) ७० तसेच विहार ३०, तुलसी २५०, तानसा ८०, वैतरणा ९०, अप्पर वैतरणा ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे २़५, लोहगाव २, कोल्हापूर २१, महाबळेश्वर ११४, मालेगाव ६, नाशिक ९, सातारा १९, मुंबई (कुलाबा) ४३, सांताक्रूझ ४८, अलिबाग १४, रत्नागिरी २९, पणजी १४, डहाणु १४३, औरंगाबाद ७, बुलढाणा १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. येत्या २४ तासात गुजरात, सौराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. कोकण, गोवा, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़. २६ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २७ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़ २८ जूनला कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMumbaiमुंबई