शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नुसतं नावालाच सायकलींच शहर ; जनजागृतीवर भरच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 2:41 PM

स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून स्मार्ट सायकल शेअरिंग ही याेजना राबविण्यात येत असली तरी या याेजनेबाबत फारशी जनजागृती करण्यात येत नसल्याने ही याेजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र अाहे.

राहुल गायकवाड पुणे : पुणे शहराला सायकलींचे शहर म्हणून अाेळखले जायचे. पुढे जाऊन पुण्याची अाेळख दुचाकींचे शहर अशी झाली. त्यामुळे वाहतूक काेंडीत माेठी भर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा सायकलींकडे वळावे यासाठी स्मार्ट सिटीच्या सहयाेगाने स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना राबविण्यास सुरुवात करण्यात अाली. सुरुवातीला या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला सध्या मात्र या याेजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. त्यातच या याेजनेत अाता अनेक सायकल कंपन्या सहभागी झाल्याने शहरात सर्वत्र सायकलींची गर्दी पाहायला मिळत अाहे. असे असले तरी या याेजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात नसल्याने पुणं हे नुसतं नावालात सायकलींच शहर हाेत आहे. 

    वर्षभरापूर्वी स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागात स्मार्ट शेअर सायकल याेजना सुरु करण्यात अाली. सुरुवातील कमी दरात या सायकली नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात अाल्या. त्यामुळे नागरिकांनी या याेजनेला चांगला प्रतिसाद दिला. सकाळी व्यायामासाठी या सायकलींचा वापर करण्यात येऊ लागला. तसेच जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा या सायकली वापरण्यात येऊ लागल्या. सुरुवातील या याेजनेत एकच कंपनी सहभागी झाली हाेती. नंतर अनेक कंपन्या या याेजनेत सहभागी झाल्याने सायकलींची संख्या वाढली. काही कंपन्यांनी तर सुरुवातील माेफत सेवा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायकल चाेरीला जाण्याचे प्रमाणही कमालीचे वाढले हाेते. नंतरच्या काळात मात्र या कंपन्यांनी भाड्याचे दर वाढवले. सुरुवातील एक रुपया प्रति अर्धातास या दराने एका कंपनीच्या सायकली भाड्याने मिळत हाेत्या. पुढे जाऊन हा दर दहा मिनिटांसाठी तीन रुपये इतका वाढवण्यात अाला. त्यामुळे नागरिकांनी या याेजनेकडे पाठ फिरवली. तसेच स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशन ही याेजना विविध भागात सुरु करण्यापलीकडे नागरिकांमध्ये विशेष जनजागृती करीत नसल्यामुळे या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत अाहे. एकीकडे दुचाकींची संख्या राेज वाढत असताना दुसरीकडे या सायकली धुळ खात पडल्याचे चित्र अाहे.     शहरात वाहनांची संख्या कमालीची वाढली अाहे. दरराेज या वाहन संख्येमध्ये भरच पडत अाहे. त्यामुळे वाहतूक काेंडी अाणि प्रदूषणातही माेठी वाढ हाेत अाहे. अशातच शेअर सायकल याेजना ही प्रभावी ठरली जाऊ शकत असताना या याेजनेबाबत स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून गांभिर्याने पाहिले जात नसल्याने ही याेजना कागदावरच राहिली असल्याचे चित्र अाहे. केवळ सायकलींची संख्या फुटपाथवर वाढवून सायकलींचे शहर अशी अाेळख देण्याचा प्रयत्न केला जात अाहे. त्यामुळे येत्या काळात या याेजनेची जनसामान्यात जनजागृती हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटीPune Cycle Schemeपुणे सायकल योजना