शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मुलीच्या अंगावर केली लघुशंका, चौथीच्या विद्यार्थ्यांचे कृत्य, वाघोली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:22 IST

मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला.

वाघोली : मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला.भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी सोमवारी सकाळी शाळेमध्ये कळविले. लघुशंका करणारा मुलगा सापडला असून, मुलीचे हात पकडणा-या एकाचा व सर्व प्रकार पाहणाºया आणखी दोघांचा शोध शिक्षक घेत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये ७०० मुली व ७०० मुले शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी ९ ची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सर्व मुले बाहेर आली होती. सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दुसरीमध्ये शिकणारी एक मुलगी शाळेच्या सीमाभिंतीलगत ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असणा-या पडक्या घरासमोर शौचालयासाठी गेली होती. त्या वेळी चौथीत शिकणारा एक विद्यार्थी तिघांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होता.मुलगी शौचालयावरून परतत असताना एका मुलाने तिचा हात पकडून खाली पाडले, तर चौथीतील विद्यार्थ्याने तिच्यावर लघुशंका केली. इतर दोन मुले घडत असलेला प्रकार पाहत होती. मुलीने हात सोडवून वर्गाच्या दिशेने पळ काढला व इतर मुलींना घडलेला प्रकार सांगितला. घाबरल्याने कोणीही शिक्षकांना माहिती दिली नाही. अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. शाळा बंद झाल्याने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगता आला नाही.सोमवारी सकाळी मुलीचे पालक मुलीला शाळेत सोडण्यासाठी आल्यानंतर शिक्षकांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मुलीने लघुशंका केलेल्या चौथीतील मुलाला ओळखल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व जमलेल्या ग्रामस्थांनी इतर उपस्थित मुलांचीही विचारपूस केली असता मुलाने सोबत असलेल्या मुलांना चेहºयाने ओळखतो. परंतु नाव, घर सांगता येत नसल्याचे शिक्षकांना सांगितले. मुख्याध्यापक इतर तिघांचा शाळेच्या आवारामध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.असे प्रकार रोखण्यासाठी खबरदारी घ्याआमच्या मुलीसोबत घडलेला प्रकार गंभीर असला तरी या वयामध्ये मुलांकडून अशा प्रकारची होणारी वर्तणूक गंभीर आहे. शिक्षक व पालकांनी मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, असे या मुलीच्या पालकांनी अपेक्षा व्यक्त केली.सीमाभिंत, सुरक्षारक्षकाची गरजजिल्हा परिषद शाळेच्या भोवताली अनेक ठिकाणी सीमाभिंतीचे काम झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी बाहेर जात असतात, तर बाहेरील मुले सहजपणे आतमध्ये येतात. शाळा सुटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेचे कुलूप तोडणे, रात्री दारू पिणे, अश्लील चाळे करणे आदी प्रकार होत असतात. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने सकाळी व रात्री सुरक्षा नेमून सीमाभिंतीचे काम करावे, अशीही मागणी होत आहे.दोन पाळीमध्ये काम व्हावेवाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये १४०० विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी मुली आणि मुलांची शाळेची वेळ एकच आहे. मधली सुट्टी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी बाहेर आल्याने शाळेच्या आवारामध्ये मोठी गर्दी होऊन शौचालयावर अधिकचा ताण येतो. मुली आणि मुलांची शाळेची वेळ दोन पाळीमध्ये करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या या प्रस्तावावर जिल्हा परिषदेने लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षक व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीPuneपुणे