डांबरीकरणाचा सपाटा
By Admin | Updated: February 15, 2016 01:31 IST2016-02-15T01:31:39+5:302016-02-15T01:31:39+5:30
अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा धडाका सुरू झाला आहे. चऱ्होली व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून

डांबरीकरणाचा सपाटा
पिंपरी : अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा धडाका सुरू झाला आहे. चऱ्होली व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डांबरीकरणाचे अनेक विषय स्थायीसमोर मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डांबरीकरणाचा सपाटा तर लावला नसेल ना, अशी चर्चा शहरात आहे.
वडमुखवाडीमधील माऊलीनगर, काटेवस्ती व चोविसावाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी १९ लाख ६६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. एका ठेकेदाराने ३३ टक्के कमी दराची निविदा सादर करून २८ लाख रुपयांत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यासह चऱ्होलीतील बुर्डेवाडी व इतर ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी १९ लाख ६२ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. ठेकेदाराने ३३.३३ टक्के कमी दराची निविदा सादर केल्याने या कामासाठी २८ लाख खर्च होणार आहे. यासह कोतवाल, काळजेवाडी, पठारेमळयातील रस्त्यांचेही डांबरीकरण होणार आहे. त्यासाठी २९ लाख ४३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच वडमुखवाडीमधील माऊलीनगर, साईनगरी, लक्ष्मीनारायणनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार असून, त्यासाठी २९ लाख ४२ हजारांचा खर्च केला जाणार आहे.
चक्रपाणी वसाहतमधील विश्वकर्मा कॉलनी, गणेशनगर व इतर ठिकाणच्या डांबरीकरण केले जाणार आहे. या कामासाठी ५२ लाख ५२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेकेदाराने ३३.३३ टक्के कमी दराची निविदा सादर केल्याने या कामासाठी ३६ लाख ७६ हजार रुपये खर्च होणार आहे. लांडगे वस्ती, महादेवनगर, हनुमाननगरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार
आहेत. प्रभाग ६० मधील मुळा नदीकडील डी. पी. रस्ता विकसित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)