शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स दर्शनासाठी वृक्षांची कत्तल

By admin | Updated: September 23, 2015 03:27 IST

मुळशी तालुक्यात सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या व्यावसायिक फ्लेक्सबाजांकडून जाहिरातीच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी होर्डिंग उभी केली जात असून

पुणे : मुळशी तालुक्यात सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या व्यावसायिक फ्लेक्सबाजांकडून जाहिरातीच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी होर्डिंग उभी केली जात असून, या होर्डिंगच्या दर्शनासाठी आड येणाऱ्या वडासारख्या अनेक जुन्या मोठमोठ्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. एका बाजूला तालुक्यात रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उदासीन असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग आता रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या बाबतीतही उदासीन असल्याचे दिसून येते. रहदारीला अडथळा ठरणारी काटेरी झाडेझुडपे तोडण्याची मागणी सामान्य नागरिक करीत असताना ती न तोडता चांगल्या पटांगणाच्या जागी वाढलेले मोठमोठे वृक्ष तोडायला बांधकाम विभागातर्फे परवानगी कशी मिळते, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. पुणे-महाड रस्त्यावर चांदणी चौकापासून पौडपर्यंत किमान दोनशे मोठी होर्डिंग उभारलेली आहेत. या होर्डिंगमागील वर्षभरात किमान ६७ झाडांची काही झाडांची अर्धी व काही झाडांची पूर्ण कत्तल करण्यात आल्याचे एका संस्थेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. या फ्लेक्स व्यावसायिकांबरोबर बांधकाम खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका नागरिकांना येत आहे. संबंधित रस्त्यावरील किती होर्डिंगधारकांनी परवाना घेतला आहे अथवा किती जणांनी संबधित खात्याची परवानगी घेतलेली नाही, हा प्रश्नही गुलदस्तातच आहे. एका बाजूला मुळशीतील संपत चाललेली वृक्षसंपदा व त्याचा इथल्या पर्यावरणावर झालेला परिणाम लक्षात घेऊन शासन या भागातील काही गावांत इको सेन्सेटीव्ह झोन आणू इच्छित असतानाच काही निवडक लोकांच्या हिताकरिता पर्यावरणाचा समतोल राखणारी मोठमोठी झाडे विनाकारण तोडताना पाहून कोणाही पर्यावरणवादी व्यक्तीला हळहळ वाटल्यावाचून राहणार नाही.