Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:07 IST2022-05-02T18:01:46+5:302022-05-02T18:07:00+5:30
मजुरांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी
पुणे : वानवडीतील विकासनगर भागात सुरु असलेल्या भोरी समाजाचे प्रार्थंनास्थळ व व्यावसायिक इमारतीच्या बांधकामावेळी जवळपास ६०० चौ.फुट (४०×१५) स्लँब व आडवा बीम खाली कोसळला. याठिकाणी स्लँब भरण्याचे काम सुरु होते. यामध्ये पाच मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती वानवडीपोलिसांनी यावेळी सांगितली.
बाबजी इन्फ्रा या (बिल्डर)कंपनीकडून बांधकाम करण्यात येत असल्याचे समजले आहे. याठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. काही कामगार काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत का याची शहानिशा करण्यात येत आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड घटनास्थळी दाखल झाले आहेत.