शेततळ्यात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:13 IST2019-08-06T20:13:18+5:302019-08-06T20:13:36+5:30

पाचगाव पर्वती येथे वनविभागाच्या जागेत अर्धा एकर परिसरात शेततळे असून ते साधारणत: १० फूट खोल आहे.

Sixteen-year-old boy drowned in a lake of farming | शेततळ्यात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू 

शेततळ्यात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू 

नऱ्हे : शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील पाचगाव पर्वती येथे घडली. विनोद विठ्ठल बर्गे (वय १६, राहणार : साईनगर, हिंगणे खुर्द) असे त्या मुलाचे नाव आहे.
सिंहगड रस्ता परिसरात असणाऱ्या पाचगाव पर्वती येथे वनविभागाच्या जागेत अर्धा एकर परिसरात शेततळे असून ते साधारणत: १० फूट खोल आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने विनोद त्याच्या मित्रांबरोबर दुपारी त्या ठिकाणी पोहायला गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. विनोद हा दहावी उत्तीर्ण होऊन त्याने नुकतीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरु केली होती. शिवशंकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाला बोलावून पाण्यातून मृतदेह काढण्यास मदत केली.  जनता अग्निशमन पर्वती विभागाचे केंद्रप्रमुख रवींद्र आढाव, लक्ष्मण गव्हाळे , महेश गारगोटे, अरुण धनवडे आदी कर्मचाऱ्यांनी पर्वतीपेक्षा उंच असणाऱ्या तसेच पावसामुळे निसरड्या झालेल्या अरुंद रस्त्यातून पायी मार्ग काढत मृतदेह बाहेर काढला. 

Web Title: Sixteen-year-old boy drowned in a lake of farming