येरवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून फोडल्या सहा गाड्यांच्या काचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 02:27 PM2019-10-28T14:27:53+5:302019-10-28T14:30:05+5:30

येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड केली.

six vehicles damaged in Yerawada pune | येरवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून फोडल्या सहा गाड्यांच्या काचा 

येरवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून फोडल्या सहा गाड्यांच्या काचा 

googlenewsNext

विमाननगर - येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी (28 ऑक्टोबर) पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना समोर  आली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक केली. तसेच सहा गाड्यांची तोडफोड केली.  या गंभीर घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी आठ ते दहा अज्ञात हल्लेखोरांनी या गाड्यांची तोडफोड केली. घटनास्थळी येरवडापोलिसांनी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील व्यसनाधीन  अल्पवयीन बालगुन्हेगारांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 

Web Title: six vehicles damaged in Yerawada pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.