गायब झालेली सहा मुले सापडली : आई वडिलांना भेटण्यासाठी गाठलं बिहार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:24 IST2018-07-07T13:24:33+5:302018-07-07T13:24:44+5:30

हडपसर परिसरातील मदरशातून बेपत्ता झालेली सहा मुले सापडली असून आई वडिलांना भेटण्यासाठी ते बिहारला पळून गेले होते. सध्या ही सर्व मुले बिहारमध्ये त्यांच्या घरी सुखरूप पोचली असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले आहे. 

Six missing children found in Bihar | गायब झालेली सहा मुले सापडली : आई वडिलांना भेटण्यासाठी गाठलं बिहार 

गायब झालेली सहा मुले सापडली : आई वडिलांना भेटण्यासाठी गाठलं बिहार 

पुणे : हडपसर परिसरातील मदरशातून बेपत्ता झालेली सहा मुले सापडली असून आई वडिलांना भेटण्यासाठी ते बिहारला पळून गेले होते. सध्या ही सर्व मुले बिहारमध्ये त्यांच्या घरी सुखरूप पोचली असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले आहे. 

    ही मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती शुक्रवारपर्यं मदरशात किंवा घरी परतली नाहीत. तीन जुलैपासून हे सर्व बेपत्ता होती.सहमद आसार उद्दीन रजा (वय १३), अन्ना महंमद आजाद शेख (वय १२), अहसान निजाम शेख (वय १५), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (वय १६), अन्वारुल इसराइल हक (वय १३) आणि रिजवान आलग सलमुद्दीन शेख (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद अबु तालीब शब्बीर आलम शेख (वय २६) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील दारुल उलूम चिस्तीया जलालिया नावाच्या मदरशामध्ये ही मुले दाखल झाली होते.

     फिर्यादींंनी मदरशात आधीपासून असलेल्या तीन मुलांसोबत त्यांना ३ जुलै रोजी सायंकाळी जवळच्या मैदानात खेळायला नेले होते. टप्प्या-टप्याने ही सर्व मुले शौचालयात जायचे असल्याचे सांगून बाहेर पडली. यानंतर ती मदरशामध्ये गेली, तेथून स्वत:चे सामान घेऊन कोणालाही काही न सांगता निघुन गेली होती . त्यांच्या कुटूंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानतर प्रत्येक कुटुंबाने वानवडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकाच ठिकाणाहून सहा मुले बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांनीही त्यांचा कसून शोध घेत होते. मात्र ट्रेनने स्वतःच्या जबाबदारीवर आईवडिलांना भेटण्यासाठी त्यांनी बिहार गाठल्याची माहिती महम्मदवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे यांनी दिली. 

Web Title: Six missing children found in Bihar