शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भोर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 4:42 PM

भोर तालुक्यातील वेळू गावातील एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या मृत झाल्या आहेत.

भोर: भोर तालुक्यातील वेळू गावातील एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या मृत झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. ५) रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबट्याचा हल्ल्याने शेळ्या मृत झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वेळू व गोगलवाडी शिवेनजीक असलेल्या शेतातील वेळू गावातील माणिक काळूराम वाडकर या शेतकऱ्याच्या त्या शेळ्या होत्या. वाडकर यांच्या शेतात बंदिस्त गोठयातील शेळ्यांवर भक्ष्याच्या शोधत असलेल्या बिबट्याने हल्ला केला. बिबट्याचा या हल्ल्यात कळपातील सहा शेळ्या मृत झाल्या. शेतकरी वाडकर शनिवारी सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार त्यांच्यासमोर आला. तालुक्यातील वेळू गोगलवाडी ससेवाडी कासुर्डी गावडदारे या परिसरात बिबट्या वावर असून, शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र, याबाबत वन विभागाने गांभीर्याने घेतलेले नाही. पिंजरा लावण्याबाबत अनेकवेळा मागणी करून देखील कारवाई झालेली नाही. बिबट्याचा हल्ल्यात शुक्रवारी सहा शेळ्या मृत झाल्यानंतर तरी वन विभाग जागे होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. नसरापूर परिक्षेत्राचे वनाधिकारी लांडगे यांच्याशी बोलणं झालं असता त्या परिसरात पाहणी करून वरिष्ठांशी बोलून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल असे सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या