शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:00 PM

डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध...

ठळक मुद्देएक पाय नसताना परिस्थितीवर मात करत झाला होता सीए....

पुणे : भैरोबानाल्याला आलेल्या पुरात गंगा सॅटेलाईट भागातून व्हिक्टर सांगळे ही व्यक्ती गाडीसह वाहून गेली आणि त्यासोबत त्याची जिद्द व परिस्थितीवर मात करुन जगण्याची उमेद ही संपली. दोन दिवसानंतर गाडी तर मिळाली पण व्हिक्टरचा तपास सहा दिवस झाले तरी लागलेला नाही. अवघ्या १७ - १८ वयात डाव्या पायाला कॅन्सरसारखा आजार असल्याचे माहित झाल्यावर जराही खचून न जाता पुढे उपचारात पाय काढावा लागला. तरुण पणातच एका पायावर पुढील आयुष्य कसे काढायचे या विचाराने खचून न जाता एमकॉमची पदवी घेत चार्टर्ड अकांउट चे स्वप्न उराशी बाळगून सीए परीक्षा पास होऊन नुकतीच प्रॅक्टीस संपवली होती.      आजारपणात डाव्या पायावर शस्त्रक्रिया करुन कृत्रिम पाय बसवण्यात आला. भाऊ व आई वडिलांच्या साथीने आयुष्यात हार न मानता शिक्षण पूर्ण करत सी. ए. पदवी मिळवली. पाय नसताना देखील व्हिक्टर ला स्विमिंग येत होते हे विशेष.  

गाडी मिळाली, पण व्हिक्टर नाही...गाडीसह वाहून गेलेल्या व्हिक्टरची गाडी शुक्रवारी सकाळी चिमटा वस्ती येथील ओढ्यात मिळाली. त्या गाडीत तो असण्याची अशा यावेळीही मावळली. त्यामुळे गाडी मिळाली असली तरी व्हिक्टर चा शोध लागला नसल्याने त्याचे मित्र, नातेवाईक व लष्करातील जवानांकडून शोधाशोध सुरु आहे.

डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध...व्हिक्टरचा भाऊ स्टीफन सांगळे हे भारतीय लष्करात मेजर या पदावर कार्यरत आहेत. पुण्याच्या पावसात भाऊ वाहून गेल्याची माहिती त्यांना कळताच, स्टीफन सांगळे विमानाने तातडीने पुण्यात आले आणि लष्कराच्या मदतीने आपल्या भावाचा शोध सुरू केला आहे. शोधकार्यात सापडलेल्या गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. डोळ्यात प्राण आणून व्हिक्टरचा भाऊ मेजर स्टीफन त्याचा शोध घेत आहेत.

वाहून जात असताना वाचवण्याची करत होता विनवणी....हिमालयातील सायकलसवारी संपवून बुधवारी सहा वाजता घरी आल्यानंतर रात्री दहा अकराच्या सुमाराला वानवडीतील मावशीकडे जात असताना गंगा सँटेलाईट येथे पुलावर पाण्यात अडकल्याचा फोन भावाला केला होता तसेच आपण पाण्यात कोठे अडकलो आहोत याचे लोकशन ही पाठवले होते. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि ते त्याचे शेवटचे संभाषण ठरले.

पाण्यात आपण वाहून जात आहोत समजल्यावर तेथे असलेल्या व्यक्तींना 'मी वाहून जात आहे मला वाचवा, मला वाचवा' अशी विनवणी व्हिक्टर करत होता. रहेजा गार्डन सोसायटीतील नागरिकांनी घराच्या गच्चीवरुन हा थरार पाहिला. घराच्या गच्चीवरुन व्हिक्टरच्या जीवन मरणाचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला. या अगोदर व्हिक्टरला पाण्यात पुढे जाऊ नका असे तेथील व्यक्तींनी सांगितले असताना देखील तो पुढे पाण्यातून जाऊ लागला.  परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो गाडीसह वाहून गेला.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर