शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शरद पवारांकडून पुण्यासाठी सहा 'कार्डियाक' रुग्णवाहिका; मृत्यूदर कमी असल्याबाबत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 21:17 IST

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

ठळक मुद्देशरद पवार यांनी घेतली पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक अत्यवस्थ कोरोना रुग्णांना देण्यात येणारे  ‘रेमिडीसिव्हर’ या इंजेक्शनचे १५० नग सुपूर्द

पुणे : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये केवळ कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकाराला जीव गमवावा लागला. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक घेत सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अवघ्या तीनच रुग्णवाहिका असल्याची माहिती समोर आल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत येत्या तीन दिवसात राष्ट्रवादीच्या ट्रस्टच्या माध्यमातून सहा 'कार्डियाक' रुग्णवाहिका पालिकेला देण्याचा निर्णय घेतला. 

बारामती होस्टेल येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीला राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.

शहरातील कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले असून आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे चित्र आहे. पुणेकर भितीच्या सावटाखाली आहेत. जम्बो कोविड सेंटर उभे करुनही समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. यावेळी शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काय करायला हवे, रुग्ण का वाढत आहेत या संदर्भात या बैठकीमध्ये पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. 

कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काम करा, नागरिकांची सुरक्षा ही सर्वात प्राधान्याची गोष्ट असल्याचे सांगत पवार यांनी महत्वपूर्ण सूचनाही केल्या. मास्क न लावल्याने राज्यात एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचाच अर्थ नागरिक अद्यापही गंभीर नसून जनजागृतीची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी बैठकीत नमूद केले. बैठकीमध्ये पवार यांनी माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांच्या मृत्यूबाबत माहिती घेतली. लवकरच राष्ट्रवादीमार्फत प्रत्येक मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. खाटा कुठे उपलब्ध आहेत, चाचणी कुठे करायची याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.==== मृत्यूदर कमी असल्याबाबत समाधानशहरातील मृत्यूदर हा २.४० टक्के असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त करीत हा मृत्यूदर आणखी खाली येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अन्य काही शहरांमध्ये मृत्यूदर साडेतीन टक्क्यांच्यावर असून पुण्यात सातारा, नगर, सोलापूर आदी शहरांमधून उपचारांसाठी येणा-यांचे प्रमाण ४० टक्के आहे.  =====अत्यवस्थ कोरोना रुग्णांना देण्यात येणारे  ‘रेमिडीसिव्हर’ या इंजेक्शनचे १५० नग पवार यांनी शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे यांच्याकडे सोपविले. हे इंजेक्शन्स ससून आणि जम्बो हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका