शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

बारामतीत शासकीय कार्यालयात शुकशुकाट; हजारो अधिकारी,कर्मचाऱ्यांचा संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 14:54 IST

जुनी पेन्शन योजना मागणीच्या संपामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली 

सांगवी : कोण म्हणत देत नाय, घेतल्या शिवाय रहात नाही,जुनी पेन्शन योजना सुरू करा, पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जुनी पेन्शन योजना  सुरू करण्याच्या मागणीसाठी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी संपात सहभागी झाले होते. देण्यात आलेल्या घोषणाबाजीमुळे सर्व कर्मचारी वर्गाचा या ठिय्यामधून रोष दिसून आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात आला.

बारामतीच्या प्रशासकीय भवना समोर सर्वांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय-निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवेसह पंचायत समिती,तहसील कार्यालयातील नागरिकांची कामे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. राज्यातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणार्थी परिचारिका व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले, प्रशासकीय विभागाची सेवा पूर्णत: कोलमडल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षक,आरोग्य कर्मचारी,महसूल कर्मचारी, सर्व शासकीय विभागातील हजारोच्या संखेने अधिकारी कर्मचारी विविध संघटना यावेळी उपस्थित होत्या. संपामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. संपामुळे नागरिकांचे हाल होताना दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीGovernmentसरकारSocialसामाजिकPensionनिवृत्ती वेतनMONEYपैसा