प. पु. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 08:44 IST2023-02-23T08:42:57+5:302023-02-23T08:44:03+5:30

निव्वळ महाराष्ट्र, भारतच नाही तर भारताबाहेर अमेरिका, हाॅलंड, दुबई आणि इंग्लंड, अशा अनेक देशांमध्ये त्यांचा भक्त समुदाय आहे.

Shrikrishna Karve Guruji passed away | प. पु. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन

प. पु. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन

पुणे : धार्मिक व ज्योतिष शास्त्रातील एक ईश्वरी अधिकारी सत्पुरुष प. पु. श्रीकृष्ण कर्वे (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९६ व्या वर्षी रात्री दोन वाजता तळेगाव दाभाडे येथे राहत्या घरी देहावसान झाले. 

निव्वळ महाराष्ट्र, भारतच नाही तर भारताबाहेर अमेरिका, हाॅलंड, दुबई आणि इंग्लंड, अशा अनेक देशांमध्ये त्यांचा भक्त समुदाय आहे. विश्वदर्शदेवताऐनम: अशा मंत्राचा जप करत पुणे mit येथे एका भव्य मंदिराची उभारणी ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. एकदाही कुंडली न पहाणे व एकही रुपया न घेणे, केवळ ईश्वरीय कार्य म्हणून जे व्रत गुरुजींनी केले ते शेवटपर्यंत अबाधित राहीले. 

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे आणि भाऊ, असा परिवार आहे. आज दुपारी तीनपर्यंत तळेगाव येथील निवासस्थानी गुरुजींचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे व नंतर अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Shrikrishna Karve Guruji passed away