शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Shree kshetra Paramdham Math : श्री क्षेत्र परमधाम मठ: अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:39 IST

हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे, ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते.

पुणे :महाराष्ट्रभूमी, संतपरंपरेने पावन झालेली भूमी, आजही विविध अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत आहे. याच परंपरेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला श्री क्षेत्र परमधाम मठ (तपोवन परिसर) हा अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे.प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज आणि प.पू. श्री महावतार बाबाजींच्या प्रेरणेने स्थापन२०१० साली पुणे-नाशिक महामार्गाजवळील आरुडेवाडी येथे श्री क्षेत्र परमधाम मठ स्थापन करण्यात आला. या मठाची स्थापना प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) आणि प.पू. श्री महावतार बाबाजी यांच्या प्रेरणेने झाली. हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे आणि ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते. अध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून या संतांच्या अवतार कार्याची ओळख सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मठाचा मुख्य उद्देश आहे.अध्यात्मासोबत सामाजिक कार्यश्री क्षेत्र परमधाम मठामध्ये केवळ अध्यात्मिक कार्याचाच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांचाही अवलंब केला जातो. या उपक्रमांमध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश आहे.• ध्यानमंदिर आणि गोशाळा स्थापन• नक्षत्र वाटिका निर्माण• आदिवासी जनांचे उत्थान आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे• स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण• वृद्धाश्रम आणि मोफत वैद्यकीय सुविधा• दुर्मिळ औषधी वृक्षांची लागवड आणि संवर्धन• जंगलातील जीवजंतू आणि गोमातेचे संरक्षणयाशिवाय समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणे, तळागाळातील जनतेपर्यंत पारमार्थिक जाणीवा पोहोचवणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानधारणेला प्रोत्साहन देणे, यावरही मठाने भर दिला आहे.दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहनमठाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी परमधाम महावतार बाबाजी सेवा फाउंडेशन समाजातील दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहन करीत आहे. आपल्या प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांनी एक वृक्ष लावावे आणि धरती मातेला सुंदर भेट देऊन निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे, असेही फाउंडेशनचे आवाहन आहे.धार्मिक अधिष्ठानातून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा संकल्पश्री क्षेत्र परमधाम मठाचा मुख्य उद्देश अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवून आणणे आहे. यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि नैसर्गिक आरोग्याचे संवर्धन होईल. आपल्या संतपरंपरेने पावन झालेल्या महाराष्ट्रात असा अनोखा अध्यात्मिक मठ स्थापन झाल्याने, तो समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकcultureसांस्कृतिकHinduहिंदूcowगाय