लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:52 IST2018-06-13T15:52:34+5:302018-06-13T15:52:34+5:30
मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवुन नेले असल्याची घटना इंदापूर येथे घडली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
इंदापूर : तरंगवाडी येथुन मुलीच्या राहत्या घरातून लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सोमवारी (दि.११जून) दुपारी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून गावातील महादेव अंकुश डोंबाळे, बाळु बापु भिसे,पारूबाई अंकुश डोंबाळे तिघे (रा.तरंगवाडी, ता.इंदापूर जि.पुणे ) व महादेव वसंत तांबे.(रा.कौठळी,ता.इंदापूर) या सर्वांनी मुलीला लग्नाचे आमिष दाखवत कारमधून पळवुन नेले असल्याची माहिती तक्रारदारांच्या जावयानी सांगितले. मुलीचा गावात इतरत्र शोध घेतला असता मुलगी सापडली नाही. यावरून मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे.पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.