शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सहकानगरमध्ये चौकीत पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:35 PM

मुलांमधील भांडणे झाल्यानंतर त्यातील मुलाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली.

ठळक मुद्देयाप्रकरणी एकाला अटक व दोन महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : मुलांमधील भांडणे झाल्यानंतर त्यातील मुलाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिघांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस चौकीत येऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार सहकारनगर पोलीस चौकीत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडला़ पोलिसांनी त्यांच्यातील एकाला अटक केली आहे़. संतोष रामदास कुचेकर (वय ४०, रा़ तळजाई वसाहत, पद्मावती) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश मरजगे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे काही मुलांमध्ये भांडण झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ भांडण करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस नाईक मरजगे आणि पोलिस शिपाई मोरे हे दोघे मार्शल दुपारी साडेतीन वाजता माने गिरणीच्या मागे असलेल्या रमेश किराणा दुकानाजवळ गेले़. त्यावेळी तेथे दोन महिलांनी त्यांना अपशब्द  वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही मार्शल पोलीस चौकीत गेल्यानंतर तेथे संतोष कुचेकर व या महिला पोलीस चौकीत आल्या़. त्यांनी शिवीगाळ करत पोलिसांना धुक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी संतोष कुचेकर याला अटक केली आहे. तर दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरPoliceपोलिसCrimeगुन्हा