पैसे देण्यास नकार देताच झाडल्या गोळ्या; पुण्यातील घटना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 06:36 AM2024-04-20T06:36:21+5:302024-04-20T06:37:16+5:30

आरोपी सहा महिन्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे.   

Shots fired upon refusal to pay Incident in Pune | पैसे देण्यास नकार देताच झाडल्या गोळ्या; पुण्यातील घटना! 

पैसे देण्यास नकार देताच झाडल्या गोळ्या; पुण्यातील घटना! 

पुणे : हॉटेलमध्ये पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा भागात घडली. या गोळीबारात विकी राजू चंडालिया (रा. जय जवान नगर, येरवडा) हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाला आहे. 

आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अमन चंडालिया, अभिषेक चंडालिया (सर्व जण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आकाशवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तो सहा महिन्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे.   

Web Title: Shots fired upon refusal to pay Incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.