घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 12:55 IST2023-09-24T12:54:53+5:302023-09-24T12:55:01+5:30

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता

Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

राजगुरुनगर: खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात वीजेचे शॉटसर्कीट झाल्याने झोपेत तरुणाचा जळून मूत्यू झाला आहे.वैभव जगन्नाथ गरुड (वय ३५ ) असे मृत तरुणाचे नांव आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मुत्यूची नोंद झाली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, खरपुडी येथील दत्तनगरमध्ये मयत वैभव गरुड हे कुंटुंबासह राहत होते. गरुड यांनी घरात गणपती बसवून मुर्ती समोर आकर्षक सजावट करून या सजावटीमध्ये विद्युत लाईटच्या माळा लावण्यात आल्या होत्या. (दि २४ ) च्या मध्यरात्री घरात विजेचे शॉटसर्कीट होऊन आग लागली. घरातील साड्या, बेड व इतर वस्तू जळून गेल्या. गादीवर झोपलेल्या वैभव गरुड यांचा जळून जागीच मूत्यू झाला. वैभव हा सर्पमित्र म्हणून या परिसरात प्रसिद्ध होता. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन लहाण मुली असून ग्रामस्थामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka..