शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगवाडी येथे दुकानाला आग

By admin | Updated: April 14, 2017 04:17 IST

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या बजरंगवाडी येथे भंगाराच्या दुकानाला सायंकाळी भीषण आग लागून त्यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या बजरंगवाडी येथे भंगाराच्या दुकानाला सायंकाळी भीषण आग लागून त्यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव येथील भंगाराच्या गोडाऊनला ८ दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी शिक्रापूर येथील रज्जाक खान (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या भंगाराच्या गोडाऊनला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर आगीचे लोळदेखील वाढू लागले, तसेच आगीचा धूरदेखील खूप अंतरावर पसरू लागला. येथे आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, महेंद्र शिंदे, संदीप जगदाळे, सुरेश डुकले यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी धुराचे लोट इतके पसरले होते, की रस्त्याने वाहनचालकांनादेखील दिसणे कठीण झाले होते. यानंतर येथील पंकज बोबडे, हरिभाऊ ढमढेरे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, सचिन सासवडे, प्रशांत तरटे, स्वप्निल टोणगे, पप्पू सासवडे, फिरोजभाई, संतोष सासवडे, नितीन सासवडे व इतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीचे लोळ वाढल्याने आग विझविणे कठीण झाले होते. बंब येथे पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना एका तासाच्या अथक परिश्रमाने आग विझविण्यात यश आले. चार ते पाच लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले होते.(वार्ताहर)