पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार; पुण्याच्या महंमदवाडी रोडवरील घटना

By विवेक भुसे | Published: June 6, 2023 11:32 AM2023-06-06T11:32:13+5:302023-06-06T11:32:31+5:30

गुन्हेगाराच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Shooting at an innkeeper out of animosity Incident on Pune Mahamadwadi Road | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार; पुण्याच्या महंमदवाडी रोडवरील घटना

पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार; पुण्याच्या महंमदवाडी रोडवरील घटना

googlenewsNext

पुणे : महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला.  त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पच्चीस शेख याच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. गुलाम दौस  खान असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पच्चीस ऊर्फ फैजान शेख व आरोपींवर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. कोंढवा पोलिसांनी त्यांना यापूर्वी अटकही केली होती. खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसर्‍याचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Shooting at an innkeeper out of animosity Incident on Pune Mahamadwadi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.