धक्कादायक!तरुणीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 16:12 IST2021-03-19T16:11:17+5:302021-03-19T16:12:27+5:30
तरुणाला बावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

धक्कादायक!तरुणीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी तरुणाला अटक
लग्नाच्या उद्देशाने तरूणीचे अपहरण करून तिला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरूणास येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमेश केशव पारधे (वय 20 रा लोहगाव) असे पोलिस कोठडी दिलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा साथीदार बाबासो कंधारे (रा. नाशिक) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. १० ते १७ मार्च २०२१ दरम्यान येरवडा, नाशिक, जुन्नर या भागात ही घटना घडली. सोमेश याने ´पीडितेचे लग्न करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत हाताने व झाडूने मारहाण तसेच विनयभंग केला. याखेरीज, दोघांनी पिडीतेला धमकी देत तिच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या करवून घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.