शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

धक्कादायक ! विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाद्वारे पाठवले घरी; कोथरूडमधील शाळेचा अजब 'प्रताप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:32 IST

आपल्या पाल्याचा दाखला हातात आल्याचे पाहून पालकांचा संताप उडाला..

ठळक मुद्देशेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले असून शिक्षणापासून राहणार वंचित

पुणे: एसएससी बोर्डाची शाळा बंद करून सीबीएससी बोर्डाची शाळा सुरू करणाऱ्या कोथरूड परिसरातील एका नामांकित शाळेने शेकडो विद्यार्थ्यांचे दाखले रजिस्टर पोस्टाने त्यांच्या घरी पाठवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या पाल्याचा दाखला हातात आल्याचे पाहून पालकांचा संताप उडाला असून आपल्याला कोणी वाली आहे की नाही, अशी उद्विग्न भावना पालक व्यक्त करत आहेत.सुरुवातीला सर्वसामान्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नामांकित शाळेने सुमारे दोन वर्षांपूर्वी एसएससी बोर्डाची शाळा बंद करून सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालकांनी शाळेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. पालकांचे याबाबत मतदानही घेण्यात आले होते.त्यावर सुमारे 80 टक्के पालकांनी विरोध दर्शविला होता.परंतु, पालकांचा विरोध न जुमानता शाळेने चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डाचे वर्ग सुरू केले. तसेच पालकांना सीबीएससी बोर्डाच्या वर्गांमध्ये प्रवेश करण्याबाबत आवाहन केले. मात्र अनेक पालकांनी आपल्या पाल्याने सीबीएसई ऐवजी एसएससी बोर्डाच्या शाळेतच शिक्षण घ्यावे, असा आग्रह धरला. अखेर शाळेने संबंधित विद्यार्थ्यांचे दाखले रजिस्टर पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी पाठविले. गेल्या आठवडाभरापासून शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांना दाखले मिळाले आहेत.---------------------कोथरूड परिसरातील शाळेने मुलांना रजिस्टर पोस्टाने दाखले पाठवले आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले असून शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. आता या विद्यार्थ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो.- प्रदीप उदागी, पालक

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी