शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ससून रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना रात्रीच्या वेळी काढले हॉटेलबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 21:06 IST

ससूनमधील कोविड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व्यवस्था विविध हॉटेल व लॉजमध्ये करण्यात आली आहे...

ठळक मुद्देरुग्णालय प्रशासनाची संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची विनंती

पुणे : क्षमतेपेक्षा जास्त संख्या झाल्याचे कारण देत हॉटेल चालकाने ससून रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना रात्री आठ वाजता हॉटेलबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकांनी विनंती केल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा त्यांना राहण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, ससून रुग्णालय प्रशासनाने संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली आहे.      ससूनमधील कोविड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील विविध हॉटेल व लॉजमध्ये करण्यात आली आहे. सध्या सुमारे ५०० जण हॉटेलमध्ये राहत आहेत. पुणे स्टेशन परिसरातील नॅशनल हॉटेलमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुमारे ६० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये बहुतांश कंत्राटी परिचारिका आहेत. त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापनाकडून पूर्वकल्पना न देता हॉटेलबाहेर जाण्यास सांगितले. रात्री अचानक बाहेर जाण्यास सांगितल्याने परिचारिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर खुपवेळ विनंती केल्यानंतर त्यांना रात्री हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले.     ससूनचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिसांना केली आहे. हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनाला आगाऊ सुचना देणे अपेक्षित होते. पण तसे न करता त्यांच्याशी गंभीर स्वरूपाचे वर्तन केले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवावा, अशी विनंती डॉ. तावरे यांनी पोलिसांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या घटनेविषयी रुग्णालयात आवाज उठविण्यात आला. परिचारिकांशी केलेल्या वर्तनाबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करणयची मागणी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.--------------‘नॅशनल हॉटेलमध्ये ४० परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण तिथे सुमारे ७० परिचारिका राहत होत्या. त्यामुळे त्यांची व्यवस्था अन्यत्र करण्याची विनंती केली होती,’ असे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासा घेऊन कार्यवाही केली जाईल.- ससून रुग्णालयातील कंत्राटी तृप्ती कोलते, तहसिलदार

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलsasoon hospitalससून हॉस्पिटलPoliceपोलिसhotelहॉटेल