धक्कादायक! पुण्यात महिला स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:00 IST2022-04-09T19:00:00+5:302022-04-09T19:00:01+5:30

पुणे : पुणे स्टेशन येथील जनसेवा शौचालयामधील महिलांच्या स्वच्छतागृहात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर एकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

shocking rape of a minor girl in a womens toilet in pune | धक्कादायक! पुण्यात महिला स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धक्कादायक! पुण्यात महिला स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे :पुणे स्टेशन येथील जनसेवा शौचालयामधील महिलांच्या स्वच्छतागृहात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर एकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे स्टेशन येथील जनसेवा शौचालयात शुक्रवारी पहाटे दीड वाजता घडली.

याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे स्टेशन येथील रेल्वे हॉस्पिटलजवळ जनसेवा शौचालय आहे. या ठिकाणी फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी पहाटे दीड वाजता गेली होती. एक नराधम अगोदरच या महिलांच्या स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्याने या मुलीला खाली पाडून तिच्यावर बलात्कार केला. ही बाब या मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title: shocking rape of a minor girl in a womens toilet in pune