धक्कादायक! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; बारामतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 21:04 IST2020-11-07T21:03:43+5:302020-11-07T21:04:05+5:30
वनवे यांचे स्वत:चे विठ्ठल मंदिर आहे. ते नेहमी सकाळ संध्याकाळ या मंदिरात पूजा अर्चा करीत असत...

धक्कादायक! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; बारामतीतील घटना
बारामती : बारामती शहरातील वनवे मळा येथील विठ्ठल मंदीराच्या गाभाऱ्यातच वृध्दाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. शनिवारी(दि ७) सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
काशिनाथ सिताराम वनवे (वय वर्ष ६०)असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. वनवे यांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वनवे यांचे स्वत:चे विठ्ठल मंदिर आहे. ते नेहमी सकाळ संध्याकाळ या मंदिरात पूजा अर्चा करीत असत. आज नेहमीप्रमाणे ते पूजेसाठी मंदिरात आले होते. मात्र, सायंकाळी त्यांनी याच मंदिरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.