वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात मोठं घबाड; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:01 IST2025-01-17T12:59:58+5:302025-01-17T13:01:34+5:30

फरार असताना वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहण्यास होता, असंही सांगितलं जात आहे.

Shocking information revealed about Valmik Karads second wife jyoti jadhav | वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात मोठं घबाड; धक्कादायक माहिती समोर

वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात मोठं घबाड; धक्कादायक माहिती समोर

Walmik Karad: पवनचक्की खंडणीनंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याने वाल्मीक कराडचा पाय खोलात गेला आहे. पोलीस कोठडीत असलेल्या कराडबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. वाल्मीक कराड याचा दोनदा विवाह झाला असून त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर पुणे परिसरात मोठी संपत्ती असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये दोन आणि खराडी इथं एक फ्लॅट आहे. ज्योती जाधवला वाल्मीक कराडपासून दोन मुलं झाली असून त्यांच्या नावावरही संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहण्यास होता, असंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचेही समोर आलं आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

पिंपरीत संपत्ती आणि नोटीस

पिंपरी शहरातील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील असलेल्या फ्लॅटचा कर वाल्मिक कराडने थकवल्याची माहिती समोर आली होती. तर या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली होती. मात्र, गुरुवारी (दि.१६) १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकलेला कर भरण्यात आला. तर दुसऱ्या फ्लॅटचाही चालू वर्षाचा कर भरण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई थांबवल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.

वाकड येथील पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील ४०३ नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. १ एप्रिल २०१६ पासून हा फ्लॅट मंजली यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत पार्क स्ट्रीट सोसायटीत जून २०२१ मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर कराचा भरणा केला आहे.

Web Title: Shocking information revealed about Valmik Karads second wife jyoti jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.