पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:29 IST2025-01-08T18:27:03+5:302025-01-08T18:29:01+5:30

कपडे बदल असताना चेंजिंग रूममध्ये मोबाईल असल्याचे एका मुलीच्या लक्षात आले आणि शिपायाचे हे कृत्य उघड झाले.

Shocking incident revealed in Pune; School girls were videotaped while changing clothes in the changing room | पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग 

पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग 

Pune Crime News: पुणे शहरातील पाषाण परिसरातील एका शाळेतील संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेतील विद्यार्थिनी पीटीच्या क्लासनंतर चेंजिंग रूमध्ये कपडे बदल असताना शिपायाने तिथे मोबाईल ठेवून  व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरातील एका शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर कपडे बदलण्यासाठी विद्यार्थिनी चेंजिंग रूममध्ये गेल्या. तिथं शाळेतील शिपाई तुषार सरोदे होता. मुलींनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र या विकृताने बाहेर जाताना आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करत मोबाइल तेथील बोर्डवर ठेवला आणि तो बाहेर गेला. कपडे बदल असताना चेंजिंग रूममध्ये मोबाईल असल्याचे एका मुलीच्या लक्षात आले आणि शिपायाचे हे कृत्य उघड झाले.

दरम्यान, याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तक्रारीनंतर पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान आपण केलेल्या कृत्याची आरोपीने कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

Web Title: Shocking incident revealed in Pune; School girls were videotaped while changing clothes in the changing room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.