जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 13:03 IST2022-01-02T13:03:04+5:302022-01-02T13:03:15+5:30
पती आणि पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असे

जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून
वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील १४ नंबर जवळील शिंदे मळ्यात रात्री महिलेचा पतीने चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केला आहे. संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती सुरेश दगडू शिंदे (वय ५९) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शिंदे व संध्या शिंदे यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असे. शनिवारी रात्रीही त्यांची भांडणे झाली होती. तेव्हा आरोपीने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनवे करत आहेत.