धक्कादायक! महिलेचा डोक्यात दगड घालून खून, ओळख पटू नये म्हणून चेहराही केला विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:53 AM2021-04-28T10:53:03+5:302021-04-28T10:54:58+5:30

एक दिवस उलटल्यानंतरही अजून या महिलेची ओळख नाही पटली

Shocking! He killed the woman by throwing stones at her head and made a face to hide her identity | धक्कादायक! महिलेचा डोक्यात दगड घालून खून, ओळख पटू नये म्हणून चेहराही केला विद्रुप

धक्कादायक! महिलेचा डोक्यात दगड घालून खून, ओळख पटू नये म्हणून चेहराही केला विद्रुप

Next
ठळक मुद्देआरोपी अजूनही फरार, पोलिसांची शोधमोहीम चालू

पुणे: एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे उघडकीस आली आहे. तिची ओळख पटू नये म्हणून दगड टाकून तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला आहे.

लोहगाव येथील कुबेर पार्कसमोरील डी. वाय. पाटील कॉलेज रोडवर मोकळ्या जागेत एका मृतदेह पडला असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका ३५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या अंगावर मोरपंखी रंगाचा गाऊन असून तिची उंची ५ फुट आहे. तिच्या डाव्या हाताचे अंगठ्याजवळ S A असे इंग्रजीत गोंदलेले आहे. कोणीतरी डोक्यात मोठा दगड टाकून तिचा खून करुन तिची ओळख पटू नये, म्हणून चेहरा छिन्नविच्छिन्न करण्यात आला आहे.

एक दिवस उलटल्यानंतरही अजून या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक महेश जगताप अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking! He killed the woman by throwing stones at her head and made a face to hide her identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.