धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 19:57 IST2019-09-01T19:55:43+5:302019-09-01T19:57:19+5:30

महिलेच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना निगडी येथे घडली

Shocking: gang rape of a woman by spraying the drug on road | धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार

धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार

पुणे (पिंपरी): महिलेच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना निगडी येथे घडली. याबाबत २१ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी निगडीतील टिळक चौक परिसरातून चालली होती. त्यावेळी तीन जणांनी तिच्या तोंडावर गुंगीचे औषध मारून तोंडावर रूमाल लावून रिक्षातून अज्ञात ठिकाणी अपहरण करून नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत. मात्र दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने परिसरातल्या नागरिकांनी मुलींच्या सुरक्षिततेच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Shocking: gang rape of a woman by spraying the drug on road