धक्कादायक! पत्नीशी झालेल्या वादातून वडिलांनी केला पाच महिन्यांच्या चिमुरडीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 18:40 IST2020-05-09T18:36:14+5:302020-05-09T18:40:00+5:30

आरोपी ड्रायव्हर असून फिर्यादी महिला बिगारी काम करतात.

Shocking ! Five-month-old children was murdered by his father after a quarrel with his wife | धक्कादायक! पत्नीशी झालेल्या वादातून वडिलांनी केला पाच महिन्यांच्या चिमुरडीचा खून

धक्कादायक! पत्नीशी झालेल्या वादातून वडिलांनी केला पाच महिन्यांच्या चिमुरडीचा खून

ठळक मुद्देयाप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल ,हिंजवडी पोलिसांनी केली आरोपीला अटक

पिंपरी : पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून पतीने पाच महिन्यांच्या चिमुरडीचे तोंड व नाक दाबले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. बावधन येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
बापुराव नामदेव जाधव (वय ३५, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी, मूळ रा. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जोताबाई बापुराव जाधव (वय २५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फियार्दी यांचा पती आहे. आरोपी ड्रायव्हर असून, फिर्यादी महिला बिगारी काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापुराव आणि फिर्यादी जोताबाई यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचे घरगुती कारणावरून सतत भांडणे होत असत. शुक्रवारी (दि. ८) देखील त्यांचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपी याने त्यांची पाच महिन्याची मुलगी झोपली असताना तिचे नाक व तोंड हाताने दाबून ठेवले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Shocking ! Five-month-old children was murdered by his father after a quarrel with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.