शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला १८ दिवसांची NIA कोठडी, वकील म्हणाले...
2
राशीभविष्य, ११ एप्रिल २०२५: आर्थिक फायद्याचा दिवस, वैचारिक समृद्धी वाढेल, वाणीवर संयम ठेवा!
3
गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा
4
१५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर २६/११चा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात
5
कराड म्हणतो, मला निर्दोष सोडा; उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला
6
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार; कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर
7
विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!
8
पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात
9
शाश्वत शहरी विकासासाठी ‘वहन क्षमता सर्वेक्षण’ करा; उच्च न्यायालयाने बजावली राज्य सरकारला नोटीस
10
राणाची २० दिवसांसाठी कस्टडी द्या; NIAची मागणी, कोर्टाकडून निकाल सुरक्षित, सुनावणीत काय झाले?
11
RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!
12
आजचा अग्रलेख: काँग्रेसची विश्रांती आणि निवृत्ती
13
आंबा बागायतदारांना ‘जीआय’चे संरक्षण; बनावट हापूस ओळखणे सहज शक्य होणार
14
विशेष लेख: एकतर तुरुंगात जा, नाहीतर अमेरिका सोडून चालते व्हा!
15
‘ई-कॅबिनेट’ असणारे महाराष्ट्र सातवे राज्य; नव्या प्रणालीचा काय फायदा होणार?
16
१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार?
17
मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी; कारण...
18
रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या
19
Virat Kohli 1000 Boundaries Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
20
फॉर्च्यूनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबरप्लेट, केरळच्या व्यावसायिकाने लावली सर्वात मोठी बोली

धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:21 IST

अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, दौंड (पुणे): शहरातील कचराकुंडीत अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव आढळल्याने मंगळवारी मोठी खळबळ उडाली. बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका बॉक्समध्ये एक अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. मात्र, अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा आहे.

‘लोकमत’चे प्रश्न

१. बॉक्स उकिरड्यावर गेला कसा?२. हॉस्पिटलमधून बरण्यांचा बॉक्स गेला? हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई का नाही?३. पोलिसांनी अज्ञातांवर म्हणण्याचे कारण काय?

बरण्यांमधील मानवी अवयव नेमके कुणाचे?

एका बाटलीत मृत अवस्थेत असलेले एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य ११ बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष होते. बॉक्सवर भंगाळे हॉस्पिटलचा नामोल्लेख असल्याने डॉक्टरांकडे पोलिसांनी चौकशी केली. बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बरण्यांवर रुग्णांची नावे होती. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप गुजर यांनी बरण्या व अवयवांची तपासणी केली. पुरुष जातीचे अर्भक असल्याचे पुढे आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी ११ बरण्यांवर असलेल्या रुग्णांच्या नावांच्या कागदपत्रांची फाइल पोलिसांना सादर केली आहे. पोलिस आणि उपजिल्हा रुग्णालय चौकशी करत आहे. या चौकशीतून वस्तुस्थिती पुढे येईल, असे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर म्हणाले.

महिला आयोगाचा काय संबंध? : या घटनेसंदर्भात राज्य महिला आयोगाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. मानवी अवशेष रुग्णालयाकडे २०२० पासून अभ्यासासाठी आहेत व नजरचुकीने कचऱ्यात गेले, अशी प्राथमिक माहिती आहे. पण, यात महिला आयोगाचा काय संबंध, हे कोडेच आहे.

मृत अर्भक साडेचार महिन्यांचे असून, त्याच्या नातेवाइकांना अर्भक नेण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी नेले नाही. बाकीच्या बरण्यांत गर्भाशयाची पिशवी काढलेले, अपेंडिक्स, हर्निया असे अवयव होते. ते २०२० पासून चुकून आमच्याकडे राहून गेले आहेत.-डॉ. प्रमोद भंगाळे, भंगाळे हॉस्पिटल

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. घटनेचा पंचनामा केला त्यानुसार योग्य ती चौकशी सुरू केलेली आहे.-बापूराव दडस, उपविभागीय पोलिस अधिकारी

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणेhospitalहॉस्पिटलGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPoliceपोलिस