अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 21:18 IST2020-09-22T21:17:48+5:302020-09-22T21:18:03+5:30

याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षाच्या पित्याला अटक केली.

Shocking! Attempted atrocity on a minor girl by step father; Incident in Kondhwa | अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार

अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार

पुणे : घरात रात्री झोपलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचा सावत्र पिता अत्याचाराचा प्रयत्न करु लागला़ तेव्हा या मुलीने तोंड दाबलेले असतानाही मोठ्या धाडसाने आपल्याच सावत्र पित्याला लाथ मारुन बाजूला केले. त्यामुळे तो खोलीतून पळून गेला. कोंढवापोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती. तिने नंतर हा प्रकार आईला सांगितला़त्यानंतर सोमवारी या मुलीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा अल्पवयीन मुलीचा सावत्र पिता आहे. तो टिंबर मार्केटमध्ये कामाला असून मार्केटयार्ड परिसरात राहतो. तो अधून मधून एनआयबीएम येथील या मुलीच्या घरी येत असतो. तो १६ सप्टेंबर रोजी पिडित मुलीच्या घरी आला होता. ही मुलगी घरामध्ये झोपली असताना मध्यरात्रीच्या सुमारास सावत्र पित्याने तिचा विनयभंग केला. त्यावेळी या मुलीला जाग आली. हे पाहून त्याने तिचे तोंड दाबून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करु लागला. सावत्र पिताच असे करत असल्याचे पाहून तिने प्रसंगावधान राखून तिच्या अंगावर येणाऱ्या पित्याला लाथ मारुन बाजूला केले. ती प्रतिकार करीत असल्याचे दिसल्यावर सावत्र पिता पळून गेला.
सावत्र पित्याने अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षाच्या पित्याला अटक केली आहे. १७ वर्षाच्या मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानाने ती अत्याचारापासून स्वत:चा बचाव करु शकली. या प्रकाराने ही मुलगी खूप घाबरली होती. हा सर्व प्रकार तिने सोमवारी आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सावत्र पित्याला अटक केली असून महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Shocking! Attempted atrocity on a minor girl by step father; Incident in Kondhwa