धक्कादायक! पिंपरीत 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 17:07 IST2018-01-20T16:23:03+5:302018-01-20T17:07:48+5:30

पिंपरीत एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. 13 जानेवारी रोजी पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने हे कृत्य केले.

Shocking 80-yr-old woman raped in Pune | धक्कादायक! पिंपरीत 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

धक्कादायक! पिंपरीत 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

पुणे - पिंपरी-चिंचवड येथील रुपीनगर परिसरातील झोपडपट्टीत राहणा-या एका 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने हे कृत्य केले. पीडित महिला तिच्या 49 वर्षीय मुलासह रुपीनगरमध्ये राहते. 13 जानेवारीला मुलगा घराबाहेर असताना आरोपीने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला व बळजबरीने बलात्कार केला. 

मुलगा  घरी परतल्यानंतर तिने सर्व घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी लगेच देहूरोड पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. या महिलेच्या वैद्यकीय तपासणीमधून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे. पीडित महिलेच्या मुलाचे लग्न झाले आहे पण पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे दोघेच आई आणि मुलगा एकत्र राहतात.                                                                   



 

Web Title: Shocking 80-yr-old woman raped in Pune