शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अबब! लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात जमावबंदीचे २४ हजार गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:28 IST

शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या पुणेकरांकडून बेशिस्तपणाचे दर्शन

ठळक मुद्देसध्या शहरातील 22 ठिकाने बंद; यातील काही ठिकाणे 'हॉट स्पॉट' 24 हजार वाहने केली जप्त 

पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. कुठलीही गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन केल्याशिवाय पुणेकरांना काही चैन पडत नाही. याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या आकडेवावरून येते. शहरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यत जमावबंदीचे 24 हजार 738 गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणारी 23 हजार 946 वाहने जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी दिली आहे. याशिवाय कलम 188 अर्थात संचारबंदीच्या नियम डावलणाऱ्यांची संख्या कमी नसून तब्बल 7 हजार 361 नागरिकांवर सरकारी आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने नागरिकांना घराबाहेर पडू नका. विनाकारण रस्त्यावर फिरू नका. जो भाग आरोग्याच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे त्याठिकाणी गर्दी करू नका. असे आवाहन करून देखील त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली असून अशा नागरिकांना पोलिसांनी अद्दल घडवली आहे. कोरोनाचे गंभीर संकट असतानाही 'प्रभातफेरी' साठी बाहेर पडणाऱ्या 126 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर विनामास्क फिरणाऱ्या 127 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या शहरातील 22 ठिकाने बंद करण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणे 'हॉट स्पॉट' आहेत.जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात संचारबंदी, जमावबंदी आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र अद्याप काही नागरिकांमध्ये कोरोनाविषयक पुरेसे गांभीर्य नसल्याचे पाहावयास मिळत आहे. यासगळ्यात ज्यांना अत्यावश्यक सेवेचे पास देण्यात आले आहेत अशा व्यक्ती, डॉक्टर, पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस