धक्कादायक! खेड तालुक्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:47 IST2021-08-17T14:31:50+5:302021-08-17T14:47:05+5:30

बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी नराधमावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking! 17 year old girl raped in Khed taluka; Pregnancy type revealed | धक्कादायक! खेड तालुक्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार

धक्कादायक! खेड तालुक्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार

ठळक मुद्देआरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चास येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी नराधमावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश वामन सपाट (वय ४४, रा.कमानची सपाटवाडी ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चास येथे घडला. मुलीची आई घरात नसताना गणेश वामन सपाट हा घरात जाऊन पिडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार, आत्याच्यार करत असतं. तीन वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे मुलीला त्रास होऊन गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. गणेश सपाट याला पोलिसांनीअटक केली असून ७ दिवसाची न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करत आहे.

Web Title: Shocking! 17 year old girl raped in Khed taluka; Pregnancy type revealed